घुसखोरांविरोधात पोलिसांची मोहिम सुरू

अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडण्यात यश

    28-Jan-2025
Total Views |
 
Rohingya
जयपूर : राजस्थानात भाजपचे सरकार असून घुसखोरांविरोधात पोलिसांची मोहिम सुरू आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी राजस्थानातील जयपूरमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या सुमारे ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडण्यात आले आहे. निर्वासितांना दिलेली ग्रीन कार्डही पोलिसांना सा़पडल्याचे वृत्त आहे. हे कार्ड फसवणूक करून बनवण्यात आल्याची माहिती समोर पोलिसांच्या तपासणीतून समोर आली.
 
या प्रकरणाच्या अहवालानुसार, पकडण्यात आलेल्या रोहिंग्या-बांगलादेशींमध्ये अनेक गुन्हेगार आणि दहशतवादी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, जयपूरमधील पोलीस ठाणे परिसरामध्ये अवैध घुसखोरांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक करत ही मोहिम राबण्यात आली आहे. सोडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३९४ रोहिंग्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ग्रीन कार्ड सापडले गेले आहे. शिवाय सांगानेर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे.
 
 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये पोलिसांनी १२ बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्या कुटुंबाला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर भारत सरकारने त्यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये बांगलादेश सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते.