महाकुंभ मेळ्यात पवित्र नद्यांमध्ये १३ कोटी भाविकांनी घेतली श्रद्धेची डुबकी

27 Jan 2025 12:48:58
Maha Kumbh

लखनऊ
: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ ( Maha Kumbh Mela ) सुरु आहे. त्यासाठी लाखो भाविक येथे जात आहेत. त्यातच आता सरकारने आकडेवारी जारी केली आहे. २७ जानेवारी रोजी ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी घेतली. उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान अमित शाह महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत.

दि. १३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्याला अनेक नागरिक आपली उपस्थिती दर्शवत आहेत. या मेळ्याला भेट देण्यासाठी भारत व भारताबाहेरुनदेखील माणसे येत आहेत. दर दिवशी हजारो व लाखोंच्या संख्येने लोक येथील पवित्र नद्यांमध्ये स्नान करत आहेत. यासंदर्भातील यादी सरकारने जारी केली. २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी येथील स्नान करण्याचा लाभ घेतला आहे. २७ जानेवारीला ४६.६४ लाखाहून अधिक भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार या स्नानांना विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान अमित शाह हेदेखील लवकरंच महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. या महाकुंभमेळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती आपल्याला दिसून आली आहे. अशाप्रकारेच हा महाकुंभ भाविकांच्या उपस्थितीने भरुन जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0