नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आम आदमी पक्ष केवळ आणि केवळ रडीचा डाव खेळत असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच यमुना नदीच्या स्वच्छतेवर भाष्य करताना केजरीवालांनी आणखी एक अर्तक्य विधान केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या लोकांना हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून पाणी प्यायला मिळतं. यमुना ही हरियाणातून दिल्लीमध्ये येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुना नदीत विष कालवल्यामुळे ती प्रदूषित केल्याचा अजब दावा केजरीवालांनी केला आहे. या संदर्भात कुठलाही पुरावा सादर न करता, केजरीवालांनी ही टीका केली आहे.
भाजपवर टीका करताना केजरीवाल म्हणाले की यमुना नदी प्रदूषित व्हावी म्हणून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी जैविक शस्त्रांचा वापर केला आहे. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून भाजपने हे कारस्थान जाणीवपूर्वक केल्याचा दावा केजरीवालांनी केला. यमुना नदीच्या स्वच्छतेवर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना सवाल केला असता, अरविंद केजरीवाल यांनी हा अजब दवा केला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने यमुना नदीच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रूपये खर्च केले. परंतु यमुना नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे.