हिंदूद्वेषाने पछाडलेल्या काँग्रेसची महाकुंभवर टीका!

    27-Jan-2025
Total Views |

mk1
 
भोपाळ: हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या पराभवानंतर, काँग्रेस पक्ष निराशेच्या गर्तेत अडकला असल्याचं बघायला मिळातं आहे. पक्षाची पुढची भूमिका काय असेल यापेक्षा दुसऱ्यांची उणीदुणी काढण्यातच काँग्रेस धन्यता मानत असल्याचं बघायला मिळतं आहे. अशातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केवळ राजकारणासाठी पवित्र महाकुंभवर टीका केली आहे. भारत सरकार गरीबांकडे लक्ष्य देण्याऐवजी महाकुंभवर एवढा पैसा का खर्च करत आहे असा सवाल खर्गे यांनी केला.

गंगेमध्ये डुबकी मारल्याने देशाचे गरिबी दूर होणार आहे का? असा सवाल खर्गे यांनी केला. गरीब मुलांना खायला अन्न नाही, तरूणांना नोकरी नाही अशा परिस्थीतीमध्ये या देशाचे नेते मात्र गंगेत डुबकी लावत आहेत अशी टीका खर्गे यांनी केली. त्याचबरोबर खर्गे म्हणाले की केवळ चांगला फोटो मिळावा म्हणून ही माणसं हे सगळं करत असतात, यांनी जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नसतं. मध्य प्रदेशच्या महू येथे एका कार्यक्रमात बोलताना खर्गे यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.