उदयनराजे भोसले यांची दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी चर्चा: म्हणाले तो सीन हटवा, अन्यथा...
27-Jan-2025
Total Views |
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विषयावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, "चित्रपटातील लेझीमच्या सीनवर आक्षेप असेल तर ते लगेचच काढून टाकावं, सिनेमातल्या चुका दुरुस्त करून सिनेमा लवकर प्रदर्शित व्हावा, अशी इच्छा असल्याचं उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांना सांगितले.
सिनेमात संभाजी महाराज यांना नृत्य करताना दाखवल्यानं मराठा संघटना आक्रमक संताप व्यक्त केला. यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांनी देखील या सगळ्यावर भाष्य करत थेट 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क साधला "सिनेमाचा जो काही वाद सुरू झालाय, जो कोणाचा आक्षेप असेल तर ते दुरुस्त करा... बोलणं सोपं असतं, पण करणं तितकीच कठीण असतं. जे करतात त्यांच्या मार्गात अडचणी येतात किंबहुना त्या आणल्या जातात. भावना दुखावल्या जात असतील तर तो सीन डिलिट करा...तसं केल्याने चित्रपटावर कोणतीच अडचण येणार नाही"..अस उदयनराजे उतेकरांना फोनवर म्हणाले.
लक्ष्मण उतेकर यांचं प्रामाणिक मतं...
तर उदयनराजे यांच्याशी बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, "आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगाला कळावा, अशी प्रामाणिक इच्छा असून त्याचाच प्रयत्न केला असल्याचं म्हटलं. ते पुढे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांचा मान, त्यांची प्रतिष्ठा राखत आम्ही सिनेमाचा प्रत्येक सीन शूट केल्याचंही ते म्हणाले.
नेमक्या कोणत्या सीनमुळे वाद पेटला?
'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एका गाण्यात संभाजी महाराज लेझीम नृत्य करताना दिसतात. तर महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखलेल्या दृश्यांमुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या.