केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले महाकुंभमेळ्यात स्नान
27-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : (Amit Shah) प्रयागराज येथे महाकुंभात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कुटुंबासह अनेक संत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्रिवेणी संगम येथे स्नान करून आरती केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या पत्नी सोनल शाह, पुत्र जय शाह कुटुंबासह महाकुंमेळ्यात प्रयागराजमधील संगम त्रिवेणी येथे पवित्र स्नान केले. स्नान करताना शाह यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा राम देव यांच्यासह संत आणि ऋषी होते. स्नान करण्यापूर्वी शाह आणि मुख्यमंत्री योगी यांनी प्रयागराजमधील संत आणि ऋषींची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री बडे हनुमान जी मंदिर आणि अभयवटलाही भेट दिली.
स्नान आणि आरतीनंतर केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी आखाड्यात जाऊन तेथे संतसमुदायाचे आशीर्वाद घेऊन जेवण केले. त्याचुप्रमाणे गुरु शरणानंद, गोविंददेव गिरी आणि श्रृंगेरी, पुरी व द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचेही दर्शन त्यांनी घेतले.