प्रार्थनास्थळ कायदा म्हणजे 'क्राईम अगेंस्ट डेमोक्रेसी' : सद्गुरु

    27-Jan-2025
Total Views |

sadhguru jaggi vasudev

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sadhguru on Places Worship Act)
इशा फाऊंडेशनचे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी प्रार्थनास्थळ कायदा हा लोकशाहीविरुद्ध गुन्हा असून तो बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. नुकतेच एका वृत्तसंस्थेसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव सध्या प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात आहेत. त्यांनी यावेळी नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार नाकारणे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचेही म्हटले आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणाले, "जेव्हा तुम्ही राष्ट्राच्या नागरिकाला असे सांगता की तो किंवा ती न्यायालयात जाऊ शकत नाही आणि त्यांना असलेल्या काही समस्येसाठी कायदेशीर मार्ग शोधू शकत नाही, तेव्हा ते लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. एखाद्या समस्येवर कायदेशीर उपाय शोधण्यासाठी ते न्यायालयातही जाऊ शकत नाहीत, असे नागरिकांना सांगायचे? मग लोकशाही कुठे आहे? आमचा दावा न्यायालयात सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो तर ती वेगळी बाब आहे. पण कोर्टात जाण्याचा अधिकार कसा नाकारता येईल? हा कसला कायदा आहे?"