आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर जरांगे उपोषणाला बसले! प्रसाद लाड यांची टीका

    27-Jan-2025
Total Views |
 
Manoj Jarange
 
मुंबई : आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर मनोज जरांगे उपोषणाला बसले असून मराठा समाजाला फसवून ही उपोषणाची नौटंकी कशासाठी? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत जरांगेंच्या उपोषणावर टीका केली.
 
प्रसाद लाड म्हणाले की, "आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील तेच विषय पुन्हा पुन्हा घेऊन उपोषणाला बसले आहेत, त्याला काहीच अर्थ नाही. केवळ समाजाच्या भावनांशी खेळण्याचा त्यांचा हा केवलीवाणा प्रयत्न आहे."
 
हे वाचलंत का? -  मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारांच्या शिक्षेत गुणात्मक बदल होईल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
"मागील दोन महिन्यात राज्याची झालेली प्रगती, देशात क्रमांक १ चे राज्य म्हणून निर्माण होत असलेली ओळख आणि सर्वच स्तरावर होत असलेले कौतुक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथून आलेली १६ लाख कोटींची गुंतवणूक, या सर्व राज्य हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांपासून लक्ष विचलित करण्यासाठी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या आकांच्या आकाकडून उपोषणाचे हत्यार नव्याने उपसले गेले आहे. राज्यातील मराठा समाजाला जे हवे आहे, ते देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार द्यायला तयार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. परंतू, मराठा समाज जरांगेंच्या नौटंकीच्या सोबत नाही, हे विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झालेले आहे. असे असतानादेखील मनोज जरांगे कोणाच्या आदेशावरून पुन्हा उपोषणाला बसले आहेत? हे त्यांनी सांगावे. अन्यथा राज्य सरकारने मराठा समाजासाठी आजवर काय केले? हे जाणून घेण्यासाठी चर्चेला यावे," असे आवाहन प्रसाद लाड यांनी जरांगेंना केले आहे.