महाकुंभात क्रीडापटूंची मांदियाळी, भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनानंतर महिला बॉक्सर मेरी कोम यांचे पवित्र स्नान

    27-Jan-2025
Total Views |

Mahakumbh Mela 2025
 
लखनऊ : महाकुंभात (Mahakumbh Mela 2025) लाखो भक्तांचा जनसमुदाय लोटला आहे. उद्योगपतींपासून ते परदेशी भाविक महाकुंभात दाखल झाले आहेत. अशातच आता महाकुंभमेळ्यात क्रीडापटूंची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. 
दि : २५ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभ मेळ्यात माजी क्रिकेटपटू सुरैश रैनाने पवित्र स्नान केले. त्यानंतर महिला बॉक्सर मेरी कोम यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी महाकुंभात पवित्र स्नानाचा आनंद घेतला आहे.
 
 
सुरेश रैना हा आपल्या कुटुंबासह महाकुंभात दाखल झाला होता. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे मेरी कोमही महाकुंभात दाखल झाल्या होत्या. त्यांनी महाकुंभात पवित्र स्नान केले. एवढेच नाहीतर त्यांनी स्नानाचा आनंद लुटला आहे. तसेच त्यांनी बॉक्सिंगची झलक दाखवली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
 
 
 
यावेळी मेरी कोम यांनी प्रयागराजमधील महाकुंभात डुबकी मारल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाकुंभ हा संस्मरणीय झाला असल्याचे मेरी कोम म्हणाल्या आहेत.
 
हिंदू धर्माबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मेरी कोम महाकुंभात दाखल झाल्या होत्या. महाकुंभातील अनुभवांना त्यांनी सर्वोत्तम क्षण असल्याचे त्या म्हणाल्या आहेच. पुढे त्या म्हणाल्या की, मी ख्रिश्चन आहे पण मला हिंदू धर्माबाबत अधिक जाणून घ्यायचे आहे. आपल्या देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप काही केले आहे. अमेरिका जपानमधून अनेक लोक महाकुंभासाठी दाखल झाले आहेत. देशाची आणखी उन्नती व्हावी. महाकुंभात आल्याने मला आनंदायी अनुभव आल्याचे मेरी कॉम यांनी प्रतिपादन केले आहे.