हिंदू संघटनांकडून धर्मांतराच्या प्रार्थनास्थळाचा भांडाफोड

    27-Jan-2025
Total Views |

 धर्मांतर
 
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरच्या मोवामधील मितन विहार वसाहतीमध्ये धर्मांतराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ माजला होता. मितन विहारमधील एका घरामध्ये प्रार्थना आणि वर्गाच्या नावाखाली धर्मांतर केले जात असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर घटनास्थळी हिंदू संघटना दाखल झाली. त्यावेळी हिंदू संघटनांनी 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या. दरम्यान ही घटना २६ जानेवारी २०२५ रोजी घडल्याचे वृत्त आहे.
 
या प्रकरणाची माहिती मिळताच सकाळी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर दाखल होत घोषणाबाजी करत निदर्शने केली आहेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संबंधित परिस्थितीत लक्ष घातले आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
घरातील सर्व लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यास पोलिसांना यश मिळाले आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ५ पुरुषांसह अनेक महिला आणि एका युवतीचा आणि एका अल्वयीन मुलीचा समावेश आहे.
 
या प्रकरणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपी अटकेत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने स्थानिक समाजात खळबळ उडाली असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.