"स्वत:साठी आणखी मोठा शीशमहल बांधा", केजरीवाल यांच्या हमीपत्रांच्या घोषणेवर नेटकऱ्याने टोकलं

    27-Jan-2025
Total Views |
 
Delhi Vidhansabha Election
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्कील टिप्पणी केली आहे.
 
 
 
केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांच्या घोषणेमध्ये महिलांसाठी रोजगार, यमुनेची साफसफाई. २४ तास पाण्याची सोय, महिलांसाठी सन्मान योजना अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत. रोजगाराची हमी देतेवेळी त्यांनी बेरोजगारांच्या टक्केवारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, बेरोजगारांची टक्केवारी ही केवळ २ आहे. पण आता संबंधित टक्केवारी नाहीशी करायची आहे.
 
मात्र, दुसरीकडे अमित शाह यांनी केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. केजरीवाल हे केवळ आश्वासन देतात, मात्र सत्यात काहीही उतरवत नाहीत. फक्त भाजप सरकारच आश्वासन पूर्ण करेल, असे अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी यमुना स्वच्छतेचे आश्वासन दिले आहे. केजरीवाल यांनी यमुना स्वच्छतेसाठी अनेकदा आश्वासन दिले आहे. त्याच आश्वासनांच्या जोरावर ते दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
 
दरम्यान केजरीवाल यांन महिला सन्मान योजनेंतर्गत दरमहा महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर आता एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर टिप्पणी केली आहे. अशातच दिल्ली विधानसभा निवडणूक ही येत्या ५ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.