नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha 2025) पार्श्वभूमीवर भाजप - आम आदमी पक्ष आमने सामने सभा घेत टीका-टीप्पणी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यमुना नदी स्वच्छ करण्याबाबत केजरीवाल आश्वासन देत आहेत. त्यांनी पुन्हा यमुना नदी स्वच्छ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नदी स्वच्छतेसाठी अकार्यक्षम असून त्यांनी अपयशाचे खापर भाजपवर फोडले आहे. हरियाणा सरकारने यमुना नदीचे पाणी अशुद्ध केल्याचा दावा केला आहे.
दिल्लीकरांना हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. यमुना नदीमध्ये हरियाणातून पाणी दिल्लीत येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा दावा केला आहे. यामुळे दिल्लीमध्ये अनेकदा अराजकता निर्माण झाली असती, असे वक्तव्य त्यांनी केले.
#WATCH | #DelhiElection2025 | AAP National Convener Arvind Kejriwal says, "...The people of Delhi get water to drink from Haryana and UP. In Yamuna, water flows into Delhi from Haryana. BJP's Haryana govt has poisoned the water in Yamuna. However, the Delhi Jal Board were… pic.twitter.com/fgZPxoBnC0
हरियाणातील भाजप सरकाने यमुना नदीच्या पाण्याला विषारी करण्यासाठी जैविक शस्त्रांवर अवलंबून असल्याचा निरर्थक दावा केला आहे. केजरीवाल म्हणाले की, भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे आहे की, ज्यामुळे जलशुद्धीकरण होऊ शकत नाही. यामुळे दिल्लीच्या काही अंशी भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली.
जसे की, अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले. काही देश नदीच्या पाण्याला विषारी करण्यासाठी जैविक शास्त्रांचा वापर करत आहेत. भाजप सरकारही तेच करत असल्याचे बेताल वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, दिल्लीतील अराजकता निर्माण व्हावी यासाठी हे सर्व सुरू असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीतील लोक मरण पावतात आणि दोष आम आदमी पक्षावर येतो. यमुना नदीचे पात्र स्वच्छ करण्यावर आम आदमी सरकार अकार्यक्षम असल्याच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी न पटणारे उत्तर दिले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.