जीवनावश्यक वस्तूंचे आमिष दाखवत ख्रिश्चन मिशनरी करत आहेत हिंदूंचे धर्मांतरण
27-Jan-2025
Total Views |
लखनऊ : उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रिय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
दिलेल्या तक्रारीनुसार, नीमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतीली बेझम गावात बाबूराम नावाच्या व्यक्तीच्या घरात ख्रिश्चन धर्मांतराचे काम सुरू असते. रविवारी २६ जानेवारी २०२५ रोजी बाबुरामने धर्मांतराच्या उद्देशाने अनेकांना आपल्या घरी बोलावून तब्येतीसंबंधित औषध असल्याचे सांगून तक्रार केलेल्या युवकाला घरी बोलावले.
घरी पोहोचल्यानंतर बाबुराम आणि प्रमोदकुमार वाल्मिकी यांनी कपाळावरील टिळा काढून घरातील देव-देवतांच्या मूर्ती हटविण्याबाबत बोलले, असा आरोप तक्रारकर्त्याने केला. ते दोन्ही लोकांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होते. तांदळाची पोती, तेल, पाण्याची बाटली देऊन धर्मांतरण केले गेले. असाच प्रयत्न आमच्यासोबत झाला. त्यामुळे हे प्रकरण लक्षात घेता त्याने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणादरम्यान नीमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून संबंधित प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर छापा टाकला. यावेळी अनेक लोक आढळून आले आणि प्राथमिक तपासात आर्थिक प्रलोभन दाखवून धर्मांतर झाल्याची पुष्टी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.