नरेंद्र मोदींना धमकी देणाऱ्या बांगालदेशी युवकाचा सोशल मीडिया पेजेसवर खटला दाखल

    27-Jan-2025
Total Views |
 
Bangladeshi
 
ढाका : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमक्या देणाऱ्या बांगलादेशस्थित असलेल्या एका कट्टरपंथी सरजीस आलमवर खटला दाखल केला आहे. विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बांगालदेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना यांची हकालपट्टी केली होती. त्यावेळी आलम प्रसिद्धीझोतात आला होता. मात्र आता सरजीस आलमच्या नेतृत्वात ढाका विद्यापीठाच्या काही सोशल मीडिया पेजेसवर खटला दाखल करण्यात आला आहे. 
 
बक्षल विभाग ढाका विद्यापीठ आणि गुन्हेगारी संबंधित दोन फेसबुक पेजेसवर कथित गुंडागिरी आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल सायबर सुरक्षा कायद्यांतर्गत खटले दाखल केले होते. तेव्हा मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने संबंधित खटले रद्द करण्याचे आदेश दिले होते.
 
पूर्वी वापरण्यात आलेल्या व्हॅट्सअॅप क्रमांकावरून काही बनावट स्क्रीनशॉट अपलोड केले. काही विशिष्ट पोस्टमध्ये त्याने माझ्याविरोधात खटलेही दाखल केले आणि माझी बदनामी केली होती, असा आरोप केला असल्याचे तो म्हणाला आहे.
 
दरम्यान, त्या पोस्टमध्ये असेही नमूद केले गेले होते की, मला जुलैमध्ये शहिद स्मृती फाउंडेशनमधून काढून टाकण्यात आले जे परिपूर्ण अयोग्य होते. त्यानंतर मी स्वेच्छेने पद सोडल असते, असा दावा त्याने केला आहे.
 
सरजीस आलम यांनी भारताला वारंवार धमकी देत माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा बांगलादेशात परतण्याची मागणी केली होती. त्याच्या भारताविरोधातल्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यामुळे जातियो नागोरिक समितीचे मुख्य संघटक पदाची धुरा देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.