देशभक्त आणि सजग नागरिकांच्या कर्तव्यानेच देश महान होतो : भैय्याजी जोशी

    27-Jan-2025
Total Views |

Bhayyaji Joshi


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhayyaji Joshi Mahakumbh)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी महाकुंभ परिसरातील झुंसी येथील गंगाधाम संघ कार्यालय राष्ट्रध्वज फडकवला. "देशभक्त आणि सजग नागरिकांच्या कर्तव्यानेच देश महान होतो. हक्कांसोबतच आपल्या नागरी कर्तव्यांनाही प्राधान्य द्यायला हवे." असे म्हणत देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या पूर्वजांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वान्तरंजन जी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.