"संगमात स्नान केल्यावर संपूर्ण संसाराची शांती प्राप्त होते" : अनुपम खेर आणि त्यांच्या आईसोबतच्या दिलखुलास गप्पा!
25-Jan-2025
Total Views |
मुंबई : लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनी महाकुंभ यात्रेतील अनुभव आणि आईसोबतच्या गप्पांचा एक मज्जेदार विडियो त्यांच्या ट्वीटर वर शेअर केला आहे. या विडियो मध्ये अनुपम खेर त्यांच्या आईला महकुंभातील त्यांचा अनुभव सांगत असताना "संगमात स्नान केल्यावर संपूर्ण संसाराची शांती प्राप्त होते" अश्या तिच्या अनोख्या आणि मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांच्या आईने योगीजी, मोदीजी आणि महाकुंभाबद्दल दिलेली हटके मतं या संवादाचा केंद्रबिंदू ठरली आहेत.
अभिनेता अनुपम खेर यांनी २२ जानेवारी २०२५ रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. स्नानादरम्यान ते भावुक झाले. कुंभमेळयातल्या अनुभवाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "महाकुंभमध्ये गंगा स्नान करून जीवन सफल झाले. पहिल्यांदा त्या स्थळी पोहोचून मंत्रोच्चार केले जिथे मां गंगा, यमुना जी आणि सरस्वती जीचा संगम होतो!सनातन धर्म की जय."
त्याचप्रमाणे त्या या विडियोच्या माध्यमातून योगीजींच्या कामाचे कौतुक देखील करताना दिसत आहेत. "कुंभमेळयाच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी योगीजी उत्तम प्रकारे सांभाळतात" असं म्हणत त्या योगीजी यांचे आभार व्यक्त करताना दिसत आहे.
अनुपम खेर यांनी महाकुंभ मेळयातील अनुभव सांगताना 'श्री स्वामी अवदेशानन्द गिरी महाराज' यांचा उल्लेख केला. आईला सांगताना अनुपम म्हणाले स्वामींनी तुला हरिद्वार मध्ये भेटण्याचे आमंत्रण दिले आहे हे सांगताच अनुपम यांच्या आईने हात जोडून त्यांना आदराने प्रणाम केल्याचे विडियो मध्ये दिसतय. हे दृश्य पाहून चाहत्यांनी तुम्ही आईला कुंभमेळ्यात का नाही घेऊन गेलात अश्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये अनुपम खेर यांचे छोटे भाऊ राजू खेर दिसत आहेत, अनुपम त्यांना "निक्कर वाले बाबा" म्हणत त्यांची हलकी फुलकी चेष्टा करताना दिसत आहेत.अनुपम खेर आपल्या आई दुलारी खेर यांच्यासोबतचे गोड संवाद वेळोवेळी शेअर करत असतात. त्यांच्या "दुलारी रॉक्स" या व्हिडिओ सिरीजमुळेही त्यांच्या आईचा साधा स्वभाव चाहत्यांपर्यंत पोहोचला आहे.
लॉकडाउनच्या काळात त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, जिथे त्यांच्या आईने शिस्तीबद्दल दिलेलं सल्ल्याचं गमतीशीर भाष्य लोकांना खूप आवडलं होतं. २०२२ मध्ये दुलारी खेर यांनी मोदीजी आणि राजकारणाबद्दल व्यक्त केलेल्या साध्या पण समर्पक मतांनीही प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. विशेषतः एका व्हिडिओमध्ये त्यांनी अनुपम यांना स्पष्ट सांगितलं होतं, "लोक तुझ्या सिनेमांपेक्षा माझ्याबद्दलच्या पोस्ट् जास्त पाहतात!" या संवादाने सर्वांना हसवले होते आणि त्यांची लोकप्रियता आणखी वाढली होती.
अनुपम खेर आणि त्यांच्या आईच्या गप्पा नेहमीच हलक्या-फुलक्या आणि भावनिक असतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांशी सहज जोडले जातात. त्यांच्या साधेपणाचा आणि गोड स्वभावाचा प्रत्यय याही वेळी महाकुंभाच्या प्रतिक्रियेतून अनुभवता आला आहे!