लखनऊ : उत्तरप्रदेश राज्याला गरिबीमुक्त राज्य बनवायचे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे. एवढचे नाहीतर उत्तर प्रदेशाच्या उत्पन्नामध्ये पुढील ४ वर्षांमध्ये १ ट्रिलियन ड्रॉलर्सची अर्थव्यवस्थेत वाढ निर्माण होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेश दिनानिमित्त उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी हे प्रतिपादन केले होते.
उत्तरप्रदेशात २०१६-२०१७ या अर्थिक वर्षात १२ कोटी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण झाली होती. सध्या राज्याची अर्थव्यवस्था ही २७ कोटींवर पोहोचली आहे. पुढील ४ वर्षांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट राज्य गाठेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार ते सत्यात उतरेल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
गरिबीमुक्त उत्तर प्रदेश राज्य व्हावे. पुढील वर्षीच्या उत्तरप्रदेश दिनापर्यंत उत्तर प्रदेशच्या अर्थिक बाबींमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्टे त्यांनी सांगितली. उत्तरप्रदेशातील गरजूंच्या डोक्यावर छप्पर, जागा जमिनींचे हक्क, आयुष्मान कार्ड, पेन्शन इत्यादींचा समावेश आहे.
तसेच उत्तर प्रदेशात विकास होत असून अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पाहता सुधारणा झाली आहे. मेट्रो, द्रुतगती मार्ग, विमानतळ यातून उत्तरप्रदेश पर्यटनाचे केंद्र बनले आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे.