मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Yogi Adityanath Sanatan) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी 'अखिल भारतीय अवधूत वेश बारा पंथ-योगी महासभे'च्या कार्यक्रमाला संबोधित केले. दरम्यान त्यांनी पौष पौर्णिमेनिमित्त त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणाऱ्या लोकांची लक्षणीय संख्या अधोरेखित केली. ते म्हणाले, सनातन धर्म एक विराट वटवृक्ष आहे. ज्याची तुलना कोणत्याही वृक्षाशी होऊ शकत नाही. जेव्हा सनातन धर्मावर संकट येईल तेव्हा भारतातील कोणताही पंथ किंवा संप्रदायास आपण सुरभित आहोत असे वाटणार नाही. कारण ते संकट केवळ सनातनवरच नाही तर सर्वांवर आलेले असेल."
हे वाचलंत का? : Drone Show Mahakumbh : शंखनादाने सुरुवात; समुद्रमंथनाचे दृष्य पाहून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, महाकुंभ हा एकात्मतेला प्रोत्साहन देणारा आध्यात्मिक कार्यक्रम आहे, महाकुंभाच्या गेल्या १० दिवसांत १० कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. येत्या ३५ दिवसांत ही संख्या ४५ कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. महाकुंभ जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना आमंत्रित करून एकतेचा संदेश देतो. इतर पंथांची स्वतःची पूजा पद्धती असू शकते, परंतु एकच धर्म आहे, आणि तो सनातन धर्म आहे, ज्याला मानव धर्म म्हणतात. भारताची शाश्वत संस्कृती तलवारीच्या बळावर नव्हे, तर सद्भावनेने आणि उपदेशाने जगापर्यंत पोहोचली आहे."