मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही : विजय वडेट्टीवार

    25-Jan-2025
Total Views |
 
Vijay Wadettivar
 
नागपूर : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मनोज जरांगेंनी शनिवार, २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. 
 
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील चित्र बघता मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार दिसत नाही. वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणे यात समाजाचे नुकसान आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशाप्रकारे घ्यायचे ते सरकार ठरवतील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  विरोधकांचे ईव्हीएमचे आंदोलन केवळ फोटो काढण्यापुरते! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
 
यावर मनोज जरांगे म्हणाले की, "विजय वडेट्टीवारांनी आंदोलन करावे. त्यांनी जनतेच्या आक्रोशाबद्दल बोलायला हवे. पण त्यांना आमची लेकरे मोठी झालेली खपत नाही."