मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Tiger Raja Singh Kolhapur) "सनातन धर्मावर जेव्हा जेव्हा संकट आले, नागा साधूनी हातात शस्त्रे घेऊन आक्रांतांना चोख प्रत्युत्तर दिले. त्याच नागा साधूंना '१५ मिनिटे' दिली तर इस्लामिक कट्टरपंथींचा चांगलाच धडा बसेल.", असे प्रतिपादन तेलंगणाचे भाजप आमदार टायगर राजा सिंह ठाकुर यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूरच्या शिरोली येथे आयोजित केलेल्या विराट हिंदू महासभेत ते बोलत होते.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या एका जाहीर सभेत '१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर शंभर कोटी हिंदूंना संपवू' अशा प्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. अकबरुद्दीन ओवेसीच्या या विधानावरून राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच '१५ मिनिटांच्या' वक्तव्याला टी राजा यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचे दिसते आहे.
ते म्हणाले, हिंदूशी पंगा घ्यायची हिंमत करू नका. उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभात लाखो नाही तर कोट्यावधी हिंदू त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये येणाऱ्या साधूंमध्ये नागा साधूही आहेत. नागा साधू कधीच सार्वजनिक ठिकाणी येत नाहीत. ते कुंभाच्या वेळीच बाहेर पडतात. त्यांचा इतिहास पाहिला तर, सनातन धर्मावर आक्रमण करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिसे आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंचा उदय झाला तेव्हा इतिहास लिहिला गेला.", असे म्हणत त्यांनी ओवैसी बंधुंना चपराक लगावल्याचे दिसते आहे.