२३ व्या क्रेडाई बीएएनएम प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

पहील्यांदाच बीएएनएम आणि बीएएनएम रायगड या एक्स्पोसाठी एकत्र

    25-Jan-2025
Total Views |



gN

 
 

नवी मुंबई : नवी मुंबई आणि रायगड या भागांतील बांधकाम क्षेत्र आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठा वाटा असलेल्या क्रेडाई बीएएनएम आणि बीएनएम रायगड यांच्याकडून एकत्रितपणे प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते २४ जानेवारीला दिमाखात उद्घाटन करण्यात आले. हा आयोजित होणाऱ्या एक्स्पोचे हे २३ वे वर्ष असून पहिल्यांदाच क्रेडाई बीएएनएम आणि बीएएनएम रायगड या दोन्ही संस्था या एक्स्पोसाठी एकत्र आल्या आहेत. नवी मुंबईतील सीवूड्स येथे एका प्रशस्त मैदानावर या भव्य एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २७ जानेवारी या कालावधीत हा एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.

 

या एक्स्पोचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्व सहभागी बांधकाम व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या. हा असा दिमाखदार एक्स्पो सर्वच सर्वसामान्य नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर निवडण्यासाठी नक्की मदत करेल. नागरिकांनी या चार दिवसीय एक्स्पोला आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन गणेश नाईक यांनी केले आहे.

 
 
 
 

क्रेडाई बीएएनएमचे अध्यक्ष वसंत भद्रा यांच्या संकल्पनेतून या संयुक्त एक्स्पो साकारला गेला आहे. या एक्स्पोमध्ये ५०० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. यामध्ये नागरिकांना १५ लाख ते २५ कोटी इथपर्यंतच्या मालमत्ता बघायला मिळतील आणि साठी लागणाऱ्या सर्व आर्थिक योजनांची माहीती देण्यासाठी १० प्रमुख बँका सहभागी होणार आहेत. यामुळे नागरिकांसाठी वनस्टॉप सोल्यूशन असणार आहे. तेव्हा नागरिकांनी मोठ्या संख्येने या एक्स्पोला भेट द्यावी असे आवाहन या एक्स्पोचे संयोजक प्रवीण पटेल यांनी केले आहे.