ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर कालवश

    25-Jan-2025
Total Views |

Narendra Chapalgaonkar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Narendra Chapalgaonkar)
ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर शनिवार, दि. २५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांची अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. वर्धा येथे झालेल्या '९६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना'सह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषवली होती. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.