महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल, काँग्रेस नेत्याने ओकली गरळ

    25-Jan-2025
Total Views |
 
Mahakumbh Mela 2025
 
प्रयागराज : काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी प्रयागरामध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत (Mahakumbh Mela 2025) असभ्य टिप्पणी केली आहे. महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी दावा केला की, १२ वर्षातून एकदा महाकुंभमेळा साजरा केला जातो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग आजार पसरला जात असल्याचे सांगितले जाते आहे.
 
आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलत असताना, त्यांनी सुरूवातीला पवित्र गंगा नदीमध्ये स्नान करत गंगा धुवून टाकली जाते, असे म्हणत त्यांनी या हिंदू श्रद्धेची खिल्ली उडवण्याचे काम केले आहे.
 
 
 
बरेच लोक गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात. यावेळी नदीमध्ये निर्माण होणारी अस्वच्छता ते पाहा. नदीमध्ये घाणीच्या पातळीत वाढ होते. हे आधी आपण पाहून घ्या. घाणीची कल्पनाही करता येणार नाही. यामुळे रोगराईचा प्रसार होईल, असे प्रतिपादन हुसेन दलवाई यांनी केले.
 
काँग्रेस नेत्याने हजमधील मक्का मदिना या इस्लामिक तिर्थक्षेत्राचे उदाहरण देत महाकुंभचा अवमान केला. भाजपच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारन सौदी अरेबियाचे अनुकरण करावे जेनेकरून प्रयागराजच्या महाकुंभमधील असलेल्या भक्तांसाठी अशीच व्यवस्था करता आली असती, असे ते म्हणाले.