लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात!

    25-Jan-2025
Total Views |
 
Ladki Bahin
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली.
 
हे वाचलंत का? -  बदलापूरमधील चिमुकलींवर अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही! जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा
 
जानेवारी २०२५ या महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक २४ जानेवारीपर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.