बांगलादेशात हिंदू युवकावर गोळीबार

मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमुळे हिंदूंच्या संरक्षणावर टांगती तलवार

    25-Jan-2025
Total Views |

 Bangladesh
 
ढाका : बांगलादेशातील (Bangladesh) खुलना जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका हिंदू युवकावर गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. पीडित युवकाचे नाव हे अर्णब कुमार असे नाव आहे. हा खुलनामघील विद्यापीठामध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. ही घटना खुलनामधील शहरातील केडीए अव्हेन्यूवरील तेतुलटोला चौकात घडली.
 
या प्रकरणी आता खुलना पोलिसांचे एडीसी मोहम्मज हबीब यांनी एका प्रसारमाध्यमाला हत्येची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, जबाबदार असलेल्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. हत्येमागला हेतू अद्यापही समोर आलेला नसून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केली नाही, असे सांगितले जात आहे.
 
 
 
या प्रकरणामध्ये स्थानिक सूत्रांनी माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्णब मोटारसायकलवरून बसून तेतुलटोला चहा पीत होता. त्यावेळी १०-१२ जणांचा घोळला घटनास्थळी आला आणि त्यांनी गोळीबार केला. त्यावेळी त्यांनी तत्काळ घटनास्थळावरून गोळीबार करत पळ काढल्याचे सांगितले. स्थानिक रहिवाशांनी त्याला तत्काळ खुलना सिटी मेडिकलमध्ये कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले.
 
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. त्यावेळी काही गोळ्या जप्त केल्या. यावेळी अर्णबचे वडील नितीश कुमार यांनी या प्रकरणामध्ये पुष्टी केली की, त्यांचा मुलगा खुलना विद्यापीठात विद्यार्थी म्हणून कार्यरत होता. मात्र या हत्येमागील शार्पशुटर नेमका कोण आहे. याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.