जेरुसलेम : हमास विरुद्ध इस्रायल (Israel-Hamas War) यांच्यात गेल्या १६ महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच युद्धजन्य परिस्थितीस पूर्णविराम भेटला आहे. हमासने ४ इस्रायली महिला सैनिकांची सुटका केली आहे. लिरी अलबाग, डॅनिएला गिलबोआ, करीना एरिव्ह आणि नामा लेव्ही अशी सैनिकांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नहल ओझ तळावरील हल्ल्यादरम्यान हमासने त्यांचे अपहरण केले होते.
प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, महिला सैनिकांच्या सुटकेनंतर इस्रायली लष्कराने त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्यावर वैद्यकीय तपासणीसाठी विशेष केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबाला भेटू शकतात. इस्रायल विरुद्ध हमास युद्धविराम करारांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. सरकार आणि अधिकारी हे महिला सैनिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे पीएमओने म्हटले आहे.
इस्रायल विरुद्ध हमास यांच्या युद्धविरामानंतर इस्रायलही सुमारे २०० पॅलिस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. दरम्यान हमासच्या हल्ल्यामध्ये १२०० हून अधिक इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात काहींचे देह होते. या प्रकरणाचा महिला सैनिकांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात हमासचे दहशतवादी हे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करताना दिसत आहेत. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.