तुमची आणि तुमच्या नेत्यांची वृत्ती रावणासारखी असुरी! चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
25-Jan-2025
Total Views |
मुंबई : तुमची आणि तुमच्या नेत्यांची वृत्तीच रावणासारखी असुरी आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केला आहे. राऊतांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
ओ शिल्लक सेनेच्या उरल्या सुरल्या विश्वाचे विश्वगुरू… तुमची बावन्न कुळे जन्माल आली तरी तुम्हाला महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची थोरवी समजणार नाही.
तुम्ही आणि तुमचे नेते यांची वृत्तीच रावणासारखी असुरी असल्याने वारंवार तुम्ही गरळ ओकत आहात.… pic.twitter.com/TYyBOk8A0D
चित्रा वाघ म्हणाल्या की, "तुमची बावन्न कुळे जन्माल आली तरी तुम्हाला महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची थोरवी समजणार नाही. तुम्ही आणि तुमचे नेते यांची वृत्तीच रावणासारखी असुरी असल्याने वारंवार तुम्ही गरळ ओकत आहात. स्वयंघोषित संपादक तथा घरगड्याने आमच्या उच्च नेत्यांवर बोलणे आणि बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे."
"राजकारणात तुमचे अस्तित्व संपत चालले असल्याने आलेली विषण्णता तुमच्या बोलण्यात जाणवते. त्यामुळे या असह्य बेताल आणि असंस्कृत शब्दांचा जो बाजर मांडत आहात तो बंद करा. उच्च न्यायालयाने मशिदी वरच्या भोंग्यावर बंदी आणली तशी गांजा फुंकून वाजणाऱ्या या भोंग्यावर देखील बंदी आणायला हवी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची सकाळ शुभ होईल," अशी खोचक टीकाही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली.