मुंबईतील पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून संपवलं जीवन

    24-Jan-2025
Total Views |


MUMBAI POLICE

मुंबई : (Mumbai Police) मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय हर्ष म्हस्के नावाच्या तरुणाने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळ्या झाडून जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी म्हाडा कॉलनीमध्ये राहणारे पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे एसपीयू मध्ये काम करतात. त्यांचा मुलगा हर्ष म्हस्के याने संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.
 
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.