मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ता आयोजित उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात त्यांचे अनेक आमदार, खासदार अनुपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गुरुवार, २३ जानेवारी रोजी अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअममध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक आजी-माजी आमदार आणि खासदार गैरहजर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई!
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, खासदार बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, दिलीप सोपल यांच्यासह अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थितीत दिसली.
गेल्या काही दिवसांपासून उबाठा गटात फुट पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीसुद्धा ठाकरेंचे आमदार आणि खासदार आमच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. अशातच ठाकरेंच्या मेळाव्यातील त्यांच्या शिलेदारांच्या अनुपस्थितीने अनेक चर्चांना उधाण आले आहे.