सहकारी संस्थाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

डॉ. पंकज भोयर करणार उपस्थितांना मार्गदर्शन

    24-Jan-2025
Total Views |

Sahakar Bharati Samvad Melawa

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sahakar Bharati Samvad Melawa) 
'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५' आणि 'सहकार भारती स्थापना दिवस' याचे औचित्य साधून सहकारी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राज्याचे गृह (ग्रामीण) व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचेसोबत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सहकार भारती, मुंबई विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता योगी सभागृह, तळमजला, स्वामीनारायण मंदिरसमोर, दादर (पूर्व) रेल्वेस्टेशन समोर संपन्न होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान डॉ. पंकज भोयर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके सहभागी होणार आहेत. तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळींचीही कार्यक्रमाला उपस्थिती असेल. मुंबई महानगरातील, कोकण विभागातील तसेच सहकार क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.