महाकुंभ परिसरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती

24 Jan 2025 16:44:58

Ram Mandir Mahakumbh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ram Mandir Mahakumbh)
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ परिसरात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या भव्य मंदिरात श्रीरामललाची प्रतिकात्मक मूर्तीही बसवण्यात आली आहे. मूर्ती हुबेहूब अयोध्येतील मूर्तीप्रमाणेच आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या शुभहस्ते नुकतेच याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

हे वाचलंत का? : भारत शक्तिशाली असल्याचा अर्थ संहारक नव्हे, तर संरक्षक असणे आहे!


Ram Mandir Mahakumbh

महाकुंभ परिसरातील सेक्टर-१ येथे राम मंदिराची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. रात्रीच्या वळी मंदिरावर होणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईमुळे मंदिर आणखी उठून दिसते. मंदिराची भव्यता आणि सौंदर्य पाहून अनेकजण भारावून जात आहेत. अशी माहिती आहे की, या राम मंदिराला भेट देण्यासाठी भाविकांना ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मंदिर परिसरात यासाठी नियमित काउंटर करण्यात आले आहेत. फायबर पासून तयार केलेले हे मंदिर मुंबईच्या बिजबाश कंपनीतर्फे उभारण्यात आले आहे. कंपनीचे प्रमुख विपुल नागदा यांनी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.
Powered By Sangraha 9.0