वंचितांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरणासाठी आणला दबाव

अखेर पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

    24-Jan-2025
Total Views |
 
धर्मांतरण
 
तिरूअनंतपुरम : अनुसूचित जाती जमातीच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश रामविलास सिंह यांनी एका ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षे तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ख्रिस्ती धर्मांतरण प्रकरणावर उत्तर प्रदेशातील धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली आहे. ख्रिस्ती धर्मातरणास जबरदस्ती करणाऱ्यांचे नाव हे पती जोश आणि पत्नी सिजा असे नाव होते. या प्रकरणात शिजाला १८ जानेवारीला तुरुंगात तर जोसला २२जानेवारीला तुरुंगवास झाला आहे. 
 
प्रसारमाध्यमानुसार, भाजप नेते चंद्रिता प्रसार, जमौली, जलालपूरचे रहिवासी यांनी १८ जानेवारी २०२३ रोजी केरळमधून आलेल्या जोस पापचन आणि त्यांची पत्नी शिजा यांनी एका वंचित समुदायाच्या वसाहतीत ३ महिन्यांची भेट दिली. यावेळी गरीब कुटुंबांना लक्ष करण्यात आले होते. तसेच त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करत फसवणूकही करण्यात आली होती. यानंतर २०२२ मध्ये पती पत्नीने मोठ्या संख्येने वंचितांना एकत्र करून त्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
दरम्यान, या प्रकरणात चंद्रिकाच्या तक्रारीदरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी वंचितांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्यावरून ख्रिस्ती धर्माचे साहित्यही जप्त केले. वंचितांच्या वसाहतीत जाऊन बायबलचे ज्ञान द्यायचे आणि त्यांचे धर्मांतरण करायचे. त्यानंतर ख्रिस्ती धर्माचे साहित्य दिले जायचे, या माहितीचा खुलासा झाला आहे. एवढेच नाहीतर ते लोक जाहीर सभा घेत वंचितांची दिशाभूल करायचे.
 
या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत सर्व पुरावे पाहिले तेव्हा दोघांनीही वंचितांना अमिष दाखवत धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केली. अवैध मार्गाने ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याच्या माहितीचा गौप्यस्फोट झाला. या प्रकरणात जोडप्याला वंचितांचे धर्मांतरण केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्यांनी धर्मपरिवर्तन कायद्यांन्वये तुरूंगवास आणि दंडात्मक शिक्षा सुनावली आहे.
 
हे सर्व पुरावे पाहता या दोघांनी दलित समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच अवैध मार्गाने त्यांचे ख्रिश्चन धर्मांतरण केले. यानंतर त्यांनी या जोडप्याला वंचितांना जबरदस्ती धर्मांतर करण्यास परावृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवून त्यांना धर्म परिवर्तन प्रतिबंध कायद्यानुसार तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली.