शेअर बाजाराची आठवड्याची अखेर निराशाजनक

३२९ अंशांची घसरण, आयटी क्षेत्राची निराशाजनक कामगिरी

    24-Jan-2025
Total Views |



sg

 
 

मुंबई : दोन दिवस शेअर बाजारात तेजीचे वारे खेळत असल्याने गुंतवणुकदारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सगळ्यांची निराशा करत बाजाराने पडझडच अनुभवली. तब्बल ३२९ अंशांची पडझड होत बाजार ७६, १९० अंशांवर थांबला. निफ्टीमध्येही ११३ अंशांची घसरणच होत २३,०९२ अंशांवर येऊन थांबला. बाजारात झालेल्या या पडझडीमागे आयटी क्षेत्रात झालेली उलथापालथ हे एक प्रमुख कारण आहे असे सांगितले जात आहे. आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी सायंट लिमिटेडच्या सीईओनी राजीनामा दिल्यामुळे आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेअर्स घसरले.

 

आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी सायंट लिमिटेडचे सीईओ, कार्तिकेयन नटराजन यांनी राजीनामा दिला. या आधी त्यांनी आर्थिक वर्ष २०२५ साठी कंपनीचा वृध्दीदर उणे २.७ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. त्यामुळे सायंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. परिणामी सर्वच आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एकुणच या नकारात्मक घटनेने बाजारात पडझड झाली. तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारातील या घसरणीला फक्त आयटी क्षेत्रातील घसरणच कारणीभूत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती कमी होण्याची आशा आणि अमेरिकेच्या धोरणांमध्ये लवचिकता या गोष्टीही कारणीभूत आहेत.

 

डॉ. रेड्डी लॅब, बीपीसीएल, अदानी इंटरप्रायजेस, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा टेलिसर्व्हिसेस, झी एनटरटेंमेंट, या कंपन्यांमच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली. याउलट हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज या कंपन्यांनी या पडझडीतही चांगली कामगिरी केली आहे. या सगळ्यामध्ये भारतीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सावध प्रतिक्रिया उमटत आहे. अशीच प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिल्या आहेत.