मुंबई : म्युच्युअल फंड्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एलआयसी म्युच्युअल फंडने नवीन एलआयसी एमएफ मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड जाहीर केला आहे. हा एक ओपन एंडेड फंड असून यातान समभाग म्हणजे इक्विटी, रोखे म्हणजे डेट फंड्स आणि कमॉडिटी क्षेत्रातील सोने आणि चांदी यात गुंतवणुक करेल. या फंडाच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त सुरक्षित परतावा सातत्यने देत राहणे हेच कंपनीचे उद्दीष्ट आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला एलआयसी म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा, आणि या योजनेचे निधी व्यवस्थापक निखिल रुंगटा, सुमित भटनागर, प्रतीक श्रॉफ हे उपस्थित होते.
हा नवीन फंड २४ जानेवारीला खुला होऊन ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू राहील. या योजनेत विविध पोर्टफोलियोजमध्ये गुंतवणुक करण्यात येणार आहे. यातून ग्राहकांना असलेली जोखीम कमी करुन रोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये तसेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडामध्ये गुंतवणुक करण्यात येणार आहे. यातून दीर्घकालीन भांडवलवृध्दी हे यामागचे मुख्य उद्दीष्ट आहे. यामध्ये ६५ टक्के, २५ टक्के कंपोझिट इंडेक्स, सोने आणि चांदी यांसारख्या कमॉडिटीज मध्ये गुंतवणुक करते. ही योजना १८ फेब्रुवारी पासून निरंतर विक्रीसाठी उपलब्ध राहील.
या योजनेबद्दल भाष्य करताना एलआयसी म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा. म्हणाले, सध्या मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड हे आजकाल खुप लोकप्रिय होत चालले आहेत. हे असे फंड्स गुंतवणुकदारांची जोखीम कमी करतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये या अशा हायब्रिड म्युच्युअल फंड्समध्ये झालेल्या गुंतवणुकीत २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर मध्ये यामध्ये ८.७७ लाख कोटींपर्यंत रक्कम या गुंतवणुकीत आहे.
हा मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड गुंतवणुकदारांचे उत्पन्न आणि बाजारातील जोखीम यांचे उत्तम नियोजन साधतो. यामुळे बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळून बाजारातील तेजीचा लाभ आपल्याला घेता येतो. त्यामुळे असे फंड्स गुंतवणुकदारांसाठी खूपच सुरक्षित ठरतील असे मत या फंडचे सहमुख्य गुंतवणुक अधिकारी निखिल रुंगटा यांनी मांडले.