राज्यात २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज!

भाजप नेते किरीट सोमय्यांची माहिती

    24-Jan-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
नागपूर : राज्याभरात २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. शुक्रवार, २४ जानेवारी रोजी नागपुर, यवतमाळ, अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "महाराष्ट्रात २०२४ मध्ये २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले. त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी दबाव आणला. हे सगळे प्रकरण आता बाहेर येत असून त्यांना अनधिकृतरित्या जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सव्वा लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा तपास करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे.
 
हे वाचलंत का? -  मालाड आणि गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद!
 
मालेगावमधील तहसीलदार आणि नायब तहसीलदाराचे निलंबन!
 
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मालेगाव येथील तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केले आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचा आदेश जारी केला.