मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दि. २४ जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते मालेगावमध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. तसेच ते गोरेगावमध्ये एका परिसंवादातही सहभागी होणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुपारी १२ वाजता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतील. तसेच त्यांच्या हस्ते मंदिरात पुजाही करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी ते मालेगाव येथील वेंकटेश्वर को-ऑपरेटिव्ह फार्ममध्ये सहकार संमेलनात उपस्थित राहतील. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी ४.१५ वाजता अमित शाह मुंबईत दाखल होणार असून गोरेगाव येथील नेस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने आयोजित परिसंवादात सहभागी होतील.