गांधीनगर : गुजरात रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने राज्यातील एकूण २७ हॉटेल्सचे करार रद्द केले आहेत. त्यामुळे यापुढे रेस्टॉरंटजवळ एसटी बस थांबणार नाही. संबंधित हॉटेलला हिंदू नावाने परवाना देण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात रेस्टॉरंट मालक हा मुस्लिम असल्याची घटना समोर येत आहे.
या यादीमध्ये वडोदरा, राजकोट, गोध्रा, मेहसाणा, भुज, भरूच अहमदाबाद, नाडियाद, पालनूर आदी विभागातील हॉटेल्सचा समावेश आहे. २७ हॉटेलच्या यादीमध्ये काही हिंदू देवतांची नावे आहेत, अशी माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. भुज-ध्रगंध्र-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल शिवशक्तीचाही या यादीत समावेश आहे. हॉटेलला हिंदू देवतेचे नाव देण्यात आले होते आणि परवानगी हिंदू नावाने घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मालक आणि व्यवस्थापन मुस्लिम होते. सुरत-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल तुलसीच्या नावाचा यादीत समावेश आहे.
याशिवाय भरुच विभागामधील सुरत-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल मारूती परमिटही रद्द करण्यात आले. हॉटेल वृंदवाडा, जे वडोदरा-गोधरा-मोडासा मार्गावर आहे. त्याची परवानगीही रद्द करण्यात आली आहे. अहमदाबाद-मेहसाणा-पालनपूर मार्गावरील हॉटेल गुरूकृपाण परमिटही पालिकेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे अहमदाबाद-राजकोट मार्गावरील हॉटेल सर्योदय, अहमदाबाद- बालासिनोर-गोधरा-जालोद मार्गावरील श्रीजी रेस्टॉरंट, अहमदाबाद-सुरत मार्गावरील हॉटेल श्यालय, हॉटेल गॅलेक्सी, हॉटेल रोनक, अहमदाबाद-ध्रगंधा-भुज मार्गावरील हॉटेल सर्वोदय, सुरत मार्गावरील हॉटेल अहमदाबाद रोडसह हॉटेस सतीमाता इत्यादींचा समावेश आहे. यापूर्वी हिंदूंच्या नावाने अनेक मुस्लिम हॉटेल मालकांनी चालवल्या जाणाऱ्या हॉटेलची चौकशी करण्याचे आवाहन सोशल मीडियावर वारंवार केले होते. अखेर या प्रकरणामध्ये गुजरात रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने कारवाई केली आहे.