नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत असतं.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली. आपल्या X सोशल मीडीया हँडलवर ते म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाह हिंद फौजेची निर्मिती करून ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे दिले होते. त्यांच्या देशभक्ती आणि त्यागासाठी ते भारतवासियांच्या कायम स्मरणात राहतील. २०२१ सालापासून केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती (२३ जानेवारी) हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी नेताजी बोस यांचं जन्मस्थान असणाऱ्या कटक येथे २३ जानेवारी ते २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. बोस यांच्या बहुआयामी कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.