मुंबई : (Chhaava) विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरला चित्रपटप्रेमींकडून मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार असे बोलले जात आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची, महाराणी येसूबाईंची आणि औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार हे एव्हाना साऱ्यांनाच कळले आहे. मात्र या सिनेमात आणखी दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.