एसबीआय जनरल इन्श्युरन्सची विक्रमी कामगिरी!

तब्बल २७३ टक्क्यांची वाढ नोंदवत ५०४ कोटींचा निव्वळ नफा

    23-Jan-2025
Total Views |


 
 

sbi 



मुंबई : विमा म्हणजे इन्श्युरन्स क्षेत्रातील महत्वाची कंपनी असलेल्या एसबीआय जनरल इन्श्युरन्सने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहील्या नऊ महीन्यांच विक्रमी कामगिरी नोंदवत ५०४ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ही वाढ एकूण नफ्याच्या २७३ टक्के इतकी प्रचंड आहे. विमा क्षेत्राच्या सर्वच प्रमुख निर्देशांकात कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. कंपनीचा ग्रॉस प्रिमियम १०.९ सकल थेट प्रिमियम १०.५ टक्क्यांनी वाढला. या सगळ्यामुळे कंपनीच्या उद्योग वाढीचा दर ७.८ टक्क्यांच्या पुढे गेला आहे तर सॉल्व्हंसी दर २.१२ टक्के तर नियामक दर १.५०च्या वर आहे. यामुळे कंपनी अतिशय मजबूत अवस्थेत आहे.

 

मोटर, आरोग्य आणि अभियांत्रिकी विम्यांनी या वाढीत मोठी कामगिरी केली आहे. विमा पॉलिसी जाहीर करणे, त्याचे नुतनीकरण करणे यासाठी डिजीटल चॅनेलच्या यशस्वी विस्ताराने व्यवसायात ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वसमावेशक धोरण, डिजीटल पर्यायांचा अवलंब, सरकारी धोरणातील सुधारणा यांमुळे विमा क्षेत्र १२ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच या सर्व धोरणाच्या अंमलबजावणीने कंपनीच्या तोट्यातही ४ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

या कामगिरी बद्दल एसबीआय जनरल इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवीनचंद्र झा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कामगिरीमुळे ग्राहकांचा आमच्या सेवांवरचा विश्वास दृढ झाला आहे. यामुळे या क्षेत्रातील नवीन कल्पना, कामातील पुढाकार, या उद्योगाच्या शाश्वत वाढीसाढी आमच्या कंपनीची बांधिलकी जपते आहे. भागधारक आणि पॉलिसीधारक यांना आमच्याकडून यापुढेही अशीच चांगली सेवा देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे असे झा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.