मुंबई : सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव, रेमो डिसूजा यांना धमकीचे मेल आले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कॉमेडियन सुगंधा श्रद्धाचाही समावेश आहे, या प्रकरणाची माहिती आता पोलिसांना देण्यात आली आहे.
मेलद्वारे दिलेल्या धमकीत नमूद करण्यात आले की, "आम्ही तुमच्यावर बारकाईकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला विश्वास आहे की, एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे फारच महत्त्वाचे आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा कोणताही एक प्रयत्न नाही, असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले होते.
एका बिष्पूने स्वाक्षरी दिलेल्या ईमेलद्वारे पुढे असे म्हटले होते की, जर त्यांनी येत्या आठ तासांत प्रतिसाद दिला नाहीतर आम्ही नक्कीच कारवाई करू. दरम्यान, याचपार्श्वभूमीवर तक्रारींच्या आधारे आंबोली आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ईमेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.