दिल्ली विधानसभेत योगी आदित्यनाथ यांचा केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल

आप नेत्यांनी घुसखोरी करणाऱ्यांना बनावट आधारकार्ड बनवून दिले!

    23-Jan-2025
Total Views |

Yogi Adityanath
 
नवी दिल्ली (Delhi Assembly Election 2025) : दिल्लीत थंडीसह विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार लोकशाहीचा अधिकार बजावणार आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप प्रत्योराप करत आहेत. प्रचार सुरू असून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा दणाणून सोडली. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा (डस्टबिन) बनवल्याचा आरोप केला आहे.
 
योगी आदित्यनाथ म्हणाले की, लोकांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा म्हटलं आहे. दिल्लीमध्ये बांगलादेशी खुसखोरी आणि रोहिंग्यांच्या झालेल्या घुसखोरीमुळे गर्दी वाढली आहे. आप नेत्यांच्या घरोघरी आधारकार्ड बनवून दिले जात आहेत. दिल्ली आणि नोएडाच्या रस्त्यांवर नजर टाकल्यास फरक लगेचच स्पष्टपणे दिसून येईल. ते पुढे म्हणाले की, २०२० मध्ये दिल्लीत दंगली झाल्या होत्या. या कटामागे आपलेही आमदार आणि नगरसेवक सापडले. ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत, असे म्हणत योगी यांनी केजरीवाल यांना आरसा दाखवला.
 
 
योगी आदित्यनाथ यांनी आव्हान दिले आणि म्हणाले की, मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या मंत्रिमंडळाने ज्या प्रकारे संगमात डुबकी मारली होती. अगदी त्याचप्रकारे अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्री यमुनेमध्ये डुबकी मारू शकतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.