शाही इदगाह मशिदीच्या तपासणीसाठी अंतरिम स्थगितीत वाढ, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जारी

22 Jan 2025 15:54:58
 
Supreme Court
 
 
लखनऊ : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  बुधवारी २२ जानेवारी २०२५ रोजी शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आणि संबंधित तपासणीसाठी दिलेल्या अंतरिम स्थगितीत वाढ करण्याचा आदेश जारी केला. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमाप आणि के.व्ही विश्वानाथन यांच्या खंडपीठाच्या मशीद समितीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर हा आदेश दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 
वास्तविकता पाहिल्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणातील संबंधित एकूण सर्व खटले मथुरा न्यायालयाकडून आपल्याकडे करून घेतले आहेत. याचबरोबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने मथुरामधील शाही इदगाह मशिदीच्या संरनेची पाहणी करण्यासाठी आता न्यायालयाच्या कमिशनरच्या नियुक्तीला परवानगी देण्याचe आदेश दिला आहे.
 
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ७ आदेश आणि ११ सीपीसी अंतर्गत शाही इदगाह मशिदीची याचिका फेटळली होती. शाही इदगाह मशीद हटवा अशी मागणी करणाऱ्या हिंदू देवता आणि हिंदूंवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यांच्या मान्यतेला याचिकेमध्ये आव्हान दिले आहे. मशीद समितीने असा युक्तीवाद केला की, प्रार्थनास्थळाच्या अंतर्गत असलेला कायदा या खटल्यांना प्रतिबंधित करतो.
 
 
Powered By Sangraha 9.0