मणिपूरच्या राजकारणात खळबळ; नितीश कुमारांचा मोठा निर्णय!

22 Jan 2025 18:03:50

Nitish Kumar
 
इंफाल : नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने मणिपूरातील एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वात मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचे एकमेव आमदार आता विरोधकांच्या पंक्तीत बसतील. या प्रकरणाचा कोणताही एक परिणाम मणिपूर सरकारच्या विकास कामावर होणार नाही. मात्र बिहारमध्ये जेडीयू हा केंद्र आणि मणिपूर सरकारसाठी फायदेशीर असणारा पक्ष आहे.
 
मणिपूरमधील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेडीयू ने सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर निवडणुकीच्या काही महिन्यांनंतर पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सत्ताधारी पक्षांच्या संख्येमध्ये विजयाची आणखी गोळाबेरीज झाली. ६० सदस्यीयांच्या विधानसभेमध्ये भाजपचे ३७ आमदार असून त्यांना नागा पीपल्स फ्रंटच्या पाच आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना बहुमत मिळणे सहज शक्य झाले आहे.
 
 
 
मणिपूरातील जेडीयूचे प्रमुख क्षेत्रीमायुम बिरोन सिंग यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना पत्राद्वारे विकासकामांची माहिती दिली. फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झालेल्या मणिपूर राज्य विधानसभेत निवडणुकीसाठी संधी दिलेल्या जणता दलाच्या सहा उमेदवारांनी घरवापसी केली. मात्र काही महिन्यानंतर जनता दल युनायटेडच्या पाच आमदारांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. जनता दलास भारताचा एक भाग झाल्यानंतर पाच आमदारांचे भारतीय संविधान स्पीकर ट्रिूब्युलनसमोर प्रलंबित ठेवण्यात आले. जनता दलाने माननीय राज्यपाल, सभागृहातील नेते अर्थातच मुख्यमंत्री आणि सभापती यांच्या कार्यालयाला कळवून मणिपूर सरकारच्या नेतृत्वाच्या अंतर्गत असलेल्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आला.
 
त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये जनता दलाचे आमदार, मो. अब्दुल नसीर विधानसभेच्या शेवटच्या सत्रात विरोधी नेत्यांच्या बाकांवरील पंक्तीत बसतील, अशी ग्वाही सभापतींनी दिली आहे, असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0