दहावी उत्तीर्ण डॉक्टर ३ वर्षे चालवत होता क्लिनिक, दररोज ७०-८० रुग्णांवर करत होता उपचार

22 Jan 2025 17:09:50

दत्तात्रेय सदाशिव पवार
 
सोलापूर : पंढरपुरातील इयत्ता दहावी शिक्षण घेतलेल्या दत्तात्रेय सदाशिव पवार या व्यक्तीने दवाखाना उभारला. त्यानंतर त्यांनी दवाखान्याच्या माध्यमातूनन ७०-८० रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली होती. हडांचे विकार आणि मधुमेहसारख्या आजारावर उपचार करायचा. वैद्यकीय शिक्षण नाही. कोणतेही प्रमाणपत्र नसतानाही दत्तात्रेय यांनी नसता उपद्रव केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, सूत्राने माहिती दिली, साताऱ्यात त्याने केवळ काही दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी या मर्यादीत वैद्यकीय प्रशिक्षण कार्यशाळेतून नंतर दवाखाना उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी औपचारिक शिक्षण आणि वैध परवाना न घेताच रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली आहे. प्रति रुग्णामागे ५०० रुपये अशी फिस आकारत सल्लामसलत करायचा. दिवसाला एकूण ७०-८० रुग्णांवर उपचार सुरू होते असे सांगण्यात आले.
 
 
 
एवढेच नाहीतर पंढरपुरसह त्याने पुढे शेगावलाही आपली सेवा वाढवली होती. त्यानंतर त्यांच्या क्लिनिकची लोकप्रियता वाढू लागली होती. अनेकांना त्याच्याकडे वैद्यकीय कागदपत्रे नसल्याची प्रचिती होती. मात्र अनेकांनी उपचार चांगला होत आहे म्हणून त्याची पाठ सोडली नाही.
 
अखेर पवार यांच्या बेकायदेशीर क्लिनिकमधील सत्य आता समोर आले आहे. जेव्हा संबंधित स्थानिकांनी त्याच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या बेकायदेशीर कृत्यावर संशय व्यक्त केला. यावेळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी क्लिनिकवर छापा टाकला. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा समोर आला आहे.
 
दरम्यान, त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय कागदपत्र नसूनही अवैधपणे दवाखाना चालवत आहेत. हिच खरी परिस्थिती तपासातून आता समोर आली होती. त्यानंतर आता आरोपी दत्तात्रेय पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे क्लिनिक बंद करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0