मुंबईत होणार ‘ब्लॉग लेखक मेळावा’!

22 Jan 2025 14:47:29

blog 
 
मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य शाखेच्या वतीने ‘ब्लॉग लेखक मेळावा’ आणि ‘लेखन कार्यशाळेचे’ शनिवार २५ जानेवारी रोजी ‘साहित्य संघाच्या तिसऱ्या मजल्यावरील डॉ. बाळ भालेराव सभागृहात’ संध्याकाळी ४ वाजता आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संघाने ब्लॉग लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन भागात एक स्पर्धा जाहीर केली होती. त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून प्रत्येक गटात तीन उत्कृष्ट ब्लॉग निवडले असून त्यांना या मेळाव्यात पुरस्कार दिले जाणार आहेत. इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील.
 
साहित्य संघाच्या उषा तांबे (कार्याध्यक्ष), अशोक बेंडखळे (कार्यवाह) आणि ब्लॉग अभ्यासक व ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनीळ सामंत या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम ज्या ब्लॉग लेखकांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यांनी तसेच इतर ब्लॉग लेखन प्रेमींनी या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0