रायपूर : केंद्र सरकारने सुरू केलेला नक्षलवादाच्या विरोधातील लढ्याला आता यश मिळत असल्याचे बघायला मिळते आहे. २१ जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीच एकूण १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. नक्षलवादी गटाचा म्होरक्या चलापथी याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल यशस्वी झाले आहे. चलापथी हा श्रीकालुलम-कोरापुट विभागातील दहशतवादी गटाचा नेता होता. चलापथी याच्यावर पोलिसांनी १ कोटी रूपयांचा इनाम जाहीर केला होता.
१७ जानेवारी रोजी छत्तीसगढ इथल्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलातील सैनिकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये २ जवान जखमी झाले, त्यांना तातडीने नजकीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. १२ जानेवारी रोजी बिजापूर येथे ५ नक्षलवादी, ज्यामध्ये २ महिलांचा सुद्धा समावेश होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये जहाल माओदी साहित्याचा सुद्धा समावेश होता. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, नक्षलवादाच्या विरोधात सुरु केलेल्या मोहीम यशस्वी होत असल्याची माहिती त्यांनी दिली.