दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्धाटन पार पडले. सोमवार, २० जानेवारी रोजी त्यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली होती.
हे वाचलंत का? - ऊसतोड कामगार स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज!
दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले आहे. पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. यात महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार होणार असून विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या महाराष्ट्रात जगाचे स्वागत करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.