RG Kar Case : कोलकाता प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा!

20 Jan 2025 19:34:45

pp1

कोलकाता(RG Kar Case): कोलकाता इथल्या आर. जी. कर महाविद्यालय आणि रूग्णालयातील प्रशिक्षणार्थ डॉक्टर महिलेवर अत्याचार करणाऱ्या संजय रॉयला पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर ५० हजार रूपयांचा दंड सुद्धा न्यायालयाने ठोठवला आहे. त्याच बरोबर नुकसान भरपाई पश्चिम बंगालच्या सरकारने पीडीत महिलेच्या कुटुंबियांना १७ लाख रूपये देण्याचा निर्णय दिला आहे.
 
९ ऑगस्ट २०२४ ला कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सबंध देशामध्ये संतापाची लूट उसळली. डॉक्टरांच्या आणि रूग्णसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. १० ऑगस्ट आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले. यानंतर आर. जी. कर महाविद्यालय आणि रूग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना आर्थीक गैरव्यव्हार प्रकरणात अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणामधील अनेक नवीन खुलासे समोर आले. अशातच सियालदह न्यायालय नेमकं काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं होतं. आरोपीच्या वकिलांनी आरोपीची मानसिक स्थिचती ठीक नसल्याचे कारण देत, त्याला पर्यायी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. अशातच आता संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


Powered By Sangraha 9.0