अमेरीकेत २४ तासात तिसऱ्यांदा दहशतवादी हल्ला!

02 Jan 2025 12:12:43

america firing

न्यूयॉर्क : महासत्ता असलेल्या अमेरीकेच्या नवीन वर्षाची सुरूवात ही दहशतीच्या छायेत झाली आहे. केवळ २४ तासांच्या कालावधीत तीसऱ्यांदा अमेरीकेत दहशतवादी हल्ला झाला असून, या वेळेस हल्लेखोराने न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरातील एका नाइट क्लबला लक्ष्य केले होते. १ जानेवारीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला लास वेगास इथल्या ट्रम्प हॉटेलच्या बाहेर टेसलाच्या सायबरट्रकचा स्फोट घडवून आणला होता, ज्यात एका माणसाचा दुदर्वेी मृत्यू झाला. स्फोट झालेल्या गाडीच्या आत एक मृत व्यक्ती असल्याची माहिती माध्यमांना मिळाली. या स्फोटासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता व्हायरल होत आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला, याचा तपास सुरू आहे. दुसऱ्या बाजूला न्यू ऑर्लीन्सच्या बोर्बन स्ट्रीट परिसरात गर्दीमध्ये एका माणसाने ट्रक घालत एकूण १० माणसांना चिरडले आहे. यानंतर ती व्यक्ती गाडीच्या बाहेर उतरली व तिने गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारत एकूण ३० माणसं गंभीररित्या जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे तसेच चिरडले गेलेल्या १० जणांचा जागीत मृत्यू झाला आहे.
 
हल्ल्यामागे इस्लामिक कट्टरपंथीय दहशतवाद्याचा हात!
न्यू ऑर्लीन्समध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या माणसाची ओळख पटलेली असून, सदर व्यक्तीचे नाव शमसुद्दीन जब्बार असून तो कट्टरपंथीय आयसीस या दहशतवादी संघटनेची जोडला गेल्याची माहिती एफबीआय कडून माध्यमांना मिळाली आहे. त्याच्या गाडीच्या डॅशबोर्डवर आयसीसचा झेंडा असल्याचे समोर आहे. हल्ला करण्याच्या काही तासांपूर्वीच त्याने सोशल मीडीयावर त्याने एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्या त्याने म्हटले होते की आयसीसच्या कार्याने त्याला प्रेरीत केले असून त्याला सुद्धा सामान्य माणसांना मारण्याची इच्छा असल्याते यात त्याने म्हटले आहे. एफबीआयने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जब्बार याने एकट्याने हा हल्ला केला नसून, त्याच्यामागे असलेल्या दहशतवादी संघटनांचा शोध सुरू आहे. आरोपीच्या गाडीमध्ये बंदुका, पाईप बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.

 
Powered By Sangraha 9.0